बीड : अंबाजोगाई बसस्थानकात पादचाऱ्याने एसटी समोर मारली उडी | पुढारी

बीड : अंबाजोगाई बसस्थानकात पादचाऱ्याने एसटी समोर मारली उडी

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा ; उदगीरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी उदगीर आगाराची बस बसस्थानकामध्ये जात असताना रस्त्याने चालत असलेल्या पादचार्‍याने एसटी समोर उडी मारली. चालकाच्या प्रसंगाधवनामुळे पादचार्‍याच्या हातावरून टायर गेल्याने हाताचा पुर्ण चुराडा झाला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकासमोर घडली.
अधिकची माहिती अशी की, उदगीर- छत्रपती संभाजीनगर (एम.एच.20.बी.एल.3824) क्रमांकाची बस छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. अंबाजोगाईच्या बसस्थानकामध्ये वळत असताना धुराजी बालाजी साळवे, (रा.अंबाजोगाई ,वय 29) याने बससमोर उडी मारली. चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ब्रेक मारला. परंतु, डाव्या बाजूचे टायर त्याच्या हातावरून गेल्यामुळे हाताचा तुकडा पडला. चालकाच्या प्रसंगधावनामुळे त्याच्या अंगावरून गाडी जाण्याची वाचविली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई आगाराच्या वतीने व शहर पोलिसांच्या वतीने पंचनामा करून जखमीला स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button