हिंगोली : खरीप हंगामातील पिकांना पावसाची प्रतिक्षा | पुढारी

हिंगोली : खरीप हंगामातील पिकांना पावसाची प्रतिक्षा

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : जवळाबाजार परिसरात मागील दहा दिवसांपासून खरीप हंगामातील पिकांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. पिकांची कोळपणे व फवारनी झाली पण पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. आज पर्यंत खरीप हंगामातील पिकास पाऊस वेळेवर पडत गेला. पण परिसरात मागील दहा ते बारा दिवस पाऊस नाही त्यामुळे खरीप हंगामात पिके पावसाच्या अभावी धोक्यात आली आहेत.

यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेवर शेतकरी बांधव हजारो रूपयांचे बियाणे व खते खरेदी केली. पण पावसाच्या विलंबाने खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवाने सोयाबीन, कापूस, तूर आदी  पिकांची पेरणी केली. नंतर पाऊसाने दडी मारली आहे. दहा ते बारा दिवस झाले तरी पावसाचे आगमन झाले नाही. आता पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी बांधव जोरदार पाऊस कधी पडणार यासाठी डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाअभावी जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. दरम्यान काही शेतकरी पाण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी पिकास स्प्रिंकलरने पाणी देऊन पिकास जीवनदान देत आहेत. मात्र अनेक वेळा पाणी उपलब्ध असुनही विज पुरवठा खंडीत होत असल्याने अडचणीत येत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button