IND vs WI 2nd T20 : टीम इंडियातून कोण होणार ‘आऊट’? ; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11 | पुढारी

IND vs WI 2nd T20 : टीम इंडियातून कोण होणार 'आऊट'? ; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि.६) गयाना येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्ये फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाखाली मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया जोरदार पलटवार करत सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात तिलकवर्माने आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात बॅटने शानदार कामगिरी केली होती. (IND vs WI 2nd T20)

यशस्वी जैस्वालला संधी मिळणार?

मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांची चांगली कामगिरी करण्यास अयशस्वी ठरले होते. ईशान किशन आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी ही आपली जादू दाखवू शकली नाही. (IND vs WI 2nd T20)

तिलक वर्माने केली शानदार कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात तिलक वर्माने आपल्या फलंदाजीने आपली छाप उमटण्यात यशस्वी ठरला. मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात तुफानी फलंदाजी करताना तिलकने अवघ्या २२ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ३ षटकार लगावले. (IND vs WI 2nd T20)

भारतीय गोलंदाजांनी केली उत्कृष्ट कामगिरी

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय युवा गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गोलंदाजीच्या वेगाच्या जोरावर अर्शदीप सिंगने विरोधी फलंदाजांना घाम फोडला. मुकेश कुमारनेही शानदार गोलंदाजी केली. तर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांनी कॅरेबियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले.

मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संभाव्य संघ :

भारतीय संघ : इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज : ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद

हेही वाचा;

Back to top button