हिंगोली: औंढा नागनाथ येथे उपजिल्हा रुग्णालय करा; आमदार संतोष बांगर यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

हिंगोली: औंढा नागनाथ येथे उपजिल्हा रुग्णालय करा; आमदार संतोष बांगर यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
Published on
Updated on

औंढा, पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली.

औंढा नागनाथ हे देशातील आठवे ज्योतिर्लिंग आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मोठया प्रमाणात भाविक येतात. या ठिकाणी दररोज ३०० ते ४०० च्या संख्येने रूग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. परंतु, या ठिकाणी पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी जावे लागते. त्याचप्रमाणे औंढा नागनाथ शहरालगत राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग असून अनेकवेळा अपघात झाल्याने उपचाराअभावी अपघातग्रस्तांचा मृत्यू होतो.

त्या अनुषंगाने  १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासोबत ट्रामा केअर सेंटर, उपजिल्हा स्त्री रुग्णालय, अतिरिक्त वैद्यकीय पदे भरणे, साथीचे रोग असल्याने या ठिकाणी तत्काळ तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त पाच वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे, रुग्ण नातेवाईक निवारा बांधकाम करणे. या सर्व मागण्या आरोग्य सेवेच्या अनुषंगाने तात्काळ मंजुर करावे. जेणे करून जनतेला याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल, रुग्णांना औंढा नागनाथ या ठिकाणीच सर्व सुविधा उपलब्ध होतील, अशी मागणी आमदार बांगर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news