छत्रपती संभाजीनगर : शेतात काम करताना विजेच्या धक्याने विवाहितेचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुंडवाडी येथे शेतात काम करत असताना विजेच्या धक्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. मनिषा वाल्मीक जाधव (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मनिषा जाधव या शेतातील कपाशीची निंदणी, खुरपणी करण्यासठी गेल्या होत्या. त्यांनी शेतात नवीन विहीर खोदली आहे. विहिरी पासून दोनशे फुट केबल टाकून विहिरीवर त्यांनी लाईट आणली आहे. त्या केबलचा शॉक मनिषा यांना लागला. यावेळी त्यांच्यासोबत सासरे विठ्ठल जाधव होते. त्यांनी मनिषा यांना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी रुपेश माटे यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि चार महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा :