Punjab Triple Murder Case : पंजाब ट्रिपल मर्डरचे गुढ उलगडले; ‘या’ कारणामुळे शेजाऱ्याने केले कृत्य | Punjab Triple Murder Case

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Punjab Triple Murder Case : लुधियाना शहरातील सालेमताबारी भागातील न्यू जनता नगर येथे ५० वर्षीय व्यक्तीसह पत्नी आणि आई या तिघांचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. पोलिसांना या ट्रिपल मर्डरचा उलगडा करण्यात यश आले आहे. (Punjab Triple Murder Case)

या प्रकरणामध्ये सासू आणि सुनेचा मृतदेह बेडवर आढळून आला होता, तर मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला. हा खून घडवून आणण्यासाठी आरोपींनी शेडतून गॅस सोडलेला होता. तसेच मृतदेहाजवळ अगरबत्ती पेटवलेली होती, जेणेकरून घराला आग लागून सर्व काही राख होईल. पोलिसांना घराचे सर्व दरवाजे कुलूपबंद आढळून आले होते.

डीजीपींनी शनिवारी (दि. ८) सकाळी ट्विट करून या प्रकरणाबाबत माहिती दिली. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, लुधियाना पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाची उकल केली आहे. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांच्या तज्ज्ञ पथकांनी तपास करून त्याची उकल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे शेजारी राहणाऱ्या एका ड्रग्ज व्यसनी व्यक्तीचा हात आहे. नशेच्या आहारी गेलेल्या शेजाऱ्याने कट रचून या तिघांचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी संशयित शेजारच्या लोकांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Punjab Triple Murder Case : शुक्रवारी सापडले होते मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, सालेमताबारी येथील न्यू जनता नगरमध्ये 50 वर्षीय चमन लाल, त्याची आई चरण कौर आणि पत्नी सुरिंदर कौरसोबत राहत होते. त्यांची चार मुले वेगवेगळ्या देशात राहतात. शुक्रवारी (दि. ७) सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्याकडे दूधवाला दूध देण्यासाठी आला होता. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणीही उत्तर दिले नाही.

दूधवाल्यामुळे मिळाली कुटुंबातील मृतदेहांची माहिती

दूधवाल्याच्या म्हणण्यानुसार, तो गुरुवारीही आला होता यावेळी कोणीही दूध घेतले नाही. त्याआधी घरकाम करणारी महिला देखील आली होती पण तिच्यासाठीही दार उघडले नव्हते. दूधवाल्याच्या या माहितीमुळे परिसरातील लोक जमा झाले. लोकांनी संबंधित घरातील लोकांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना एका खोलीत रक्ताने माखलेले मृतदेह दिसून आले. त्यानंतर भिंत पाडून एका तरुणाला आत पाठवण्यात आले. त्याने दार उघडल्यावर लोक आत गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू, जेसीपी सौम्या मिश्रा, डीसीपी हरमीत सिंग हुंदल आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास सुरू केला असता घरात गॅसचा वास आला आणि मृतदेहाजवळ एक जळलेली अगरबत्ती सापडली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news