लातूर : सराईत दरोडेखोरांच्या टोळी विरोधात मोक्का

लातूर : सराईत दरोडेखोरांच्या टोळी विरोधात मोक्का

लातूर, पुढारी वृतसेवा :  आंबेजोगाई रोड येथील डी मार्ट जवळील असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये १५ मे रोजी सशस्त्र दरोडा घालण्यात आला होता. यासह जिल्ह्यात आणखी पाच ठिकाणी व महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा घालण्यात आला होता. याप्रकरणी पाच दरोडेखोरांवर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

महेश आसाराम चव्हाण (गेवराई), नितीन संजय काळे उर्फ बापू टांग्या काळे (अहमदनगर), विकास रामभाऊ भोसले (बीड), रवींद्र संजय काळे (अहमदनगर), व लक्ष्मण पांडुरंग भोसले, ( उमापूर, जिल्हा बीड ) अशी त्यांची नावे आहेत. मोक्का अंतर्गतची ही लातूर जिल्ह्यातील अलिकडच्या काळातील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

दरोडेखोरांनी लातूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी टोळी करून सशस्त्र दरोडे टाकले आहेत. त्यांच्याविरूद्ध जीवे मारणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक हत्याराने दुखापत करून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे, असे गुन्हे निष्पन्न झाले आहेत. त्यानुसार या दरोडेखोरांविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, यासाठी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

  हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news