Ajit Pawar Latest: अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने विकासाला वेग येईल: दीपक केसरकर | पुढारी

Ajit Pawar Latest: अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने विकासाला वेग येईल: दीपक केसरकर

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा: राज्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे. आता उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार (Ajit Pawar Latest) यांनी शपथ घेतल्याने राज्यातील विकासाला वेग येईल, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

केसरकर म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar Latest) यांच्या सरकारमध्ये येण्याने सरकार भक्कम झाले आहे. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राची प्रगती अधिक वेगाने होईल. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या येण्याने शिंदे गटातील मंत्र्यांची तोंडे पडली, अशा वक्तव्य केल्याचे निदर्शनास आणून दिले असता राऊत यांचे वक्तव्य महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाही. कारण ते अशी वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, असे केसरकर म्हणाले. राऊत यांना नेहमी पोटदुखी होत असते.त्यातून ते अशी वक्तव्ये करत असतात, असा टोला केसरकर यांनी लगावला. मुख्यमंत्री शिंदे यांचा अजित पवार यांना सरकारमध्ये सामील करून घेण्यात महत्त्वाचा रोल होता. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र काम करू.

शिवसेना एकच आहे. धनुष्यबाण हे चिन्ह एकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीही सुद्धा एकच आहे. त्यांचे घड्याळ हे चिन्ह आहे. आणि अजित पवार यांनी यापुढील निवडणुका घड्याळाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button