खडकपुरातील बालविवाह रोखण्यास बीड जिल्हा प्रशासनाला यश | पुढारी

खडकपुरातील बालविवाह रोखण्यास बीड जिल्हा प्रशासनाला यश

बीड; पुढारी वृत्तसेवा :  १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात बीड जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. याप्रकरणी मुलीच्या आई – वडीलासह मामा – मामी व भटजीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बीड शहरातील खडकपुरा भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांच्या कानावर आली होती. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलीस प्रशासन व महिला बालकल्याण विभाग दिली. त्यानुसार बालकल्याण विभागासह पोलिस प्रशासनाने विवाह सुरू असलेल्या ठिकाणी धाड मारली. याप्रकरणी अल्पवयींन मुलीचे आई – वडील , मामी – मामी, फोटोग्राफर, भटजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह थांबण्याचे नावच घेत नाहीत. त्यामुळे बालविवाह विरोधात आता प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

यावेळी प्रशिक्षणार्थी आय ए एस आदित्य जीवने(IAS), सुधीर ढाकणे (जिल्हा महिला बालविकास अधिकारी बीड ), आर एस पवार पोलीस उपनिरीक्षक पेठ बीड यांनी ही कारवाई केली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी सहकार्य केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button