Gautami Patil: पहिले गाणे संपताच गौतमी पाटीलने दहा मिनिटांत गुंडाळला कार्यक्रम, कारण… | पुढारी

Gautami Patil: पहिले गाणे संपताच गौतमी पाटीलने दहा मिनिटांत गुंडाळला कार्यक्रम, कारण...

धर्माबाद: पुढारी वृत्तसेवा: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम धर्माबाद शहरात आयोजित करण्यात आला होता. नियोजित वेळेपेक्षा दोन ते अडीच तास विलंबाने हा कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे हुल्लडबाज प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

धर्माबादच्या मोंढा मैदानात महिला प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी केली होती. गौतमी पाटील (Gautami Patil) स्टेजवर येताच आणि पहिले गाणे संपताच हुलडबाजांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गौतमीने तुम्हा बघून तोल माझा गेला… हे पहिलेच गाणे सादर केले. गौतमीचा डान्स आणि तिच्या दिलखेचक अदा पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजविण्यास सुरूवात केली. प्रेक्षकांनी जागेवर उभं राहून डान्स सुरू केला. त्याचबरोबर मैदानात खुर्च्यांची मोडतोड सुरू केल्याने धावपळ सुरू झाली. तेव्हा प्रेक्षकांना आवरताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. गौतमीने पेक्षकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पण गोंधळ थांबत नसल्याने गौतमीने 10 मिनिटांतच कार्यक्रम आटोपता घेण्याचा निर्णय घेतला. केवळ दीड गाणं झाल्यानंतर ती स्टेजवरून निघून गेली.

हुल्लडबाजांनी पोलिसांशी वाद घालण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे गौतमी पाटील यांनी कार्यक्रम न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे हुल्लडबाजांनी अधिकच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Gautami Patil : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान, गौतमी पाटील हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला महिलासह तरुणांची मोठी गर्दी होत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला आबालवृद्धांचीही मोठी उपस्थिती असते. परंतु गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गोंधळाचे गालबोट लागू लागले आहे. त्यामुळे कार्यक्रम अर्ध्यावरच थांबविण्याची वेळ आयोजकावर येऊ लागली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होऊ लागला आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त असे समीकरणच बनले आहे.

हेही वाचा 

Back to top button