नांदेड- देगलूर मार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

नांदेड- देगलूर मार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

देगलूर; पुढारी वृत्तसेवा : माल वाहून नेणाऱ्या टेंपोने मोटरसायकल स्वारास समोरून जोराची धडक दिली. यात मोटरसायकलवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ३) दुपारी खानापूर – मुजळगा  फाट्यादरम्यान घडली. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो (एमएच २६ एडी ०३१२) लाकडी भुसा भरून देगलूरवरून नांदेडकडे जात होता. त्याचवेळी मोटरसायकलवरून (एमएच २६ बीएम ६०४०)  नरसीहून महेश अशोकराव बाबरे (रा. बालाजी मंदिर, नरसी) हा युवक देगलूरकडे येत होता. त्यावेळी टेम्पोने मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली. त्यात महेश बाबरे जागीच ठार झाला.

अपघातस्थळावरून  टेंपो चालक पसार झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. याप्रकरणी देगलूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button