हिंगोली: रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास: ३००हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त

हिंगोली: रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास: ३००हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये पालिका प्रशासनाने सुरु केलेली अतिक्रमण हटावो मोहिम शुक्रवारी कायम होती. मागील पाच दिवसांत पालिकेने तब्बल 300 पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविल्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.

शहरात मागील काही दिवसांमध्ये अतिक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. शहरातील अंतर्गत रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे वाहतुकीसाठी मोठा अडथळा बनली होती. त्यातच अनेक ठिकाणी हातगाडे रस्त्यावर लावले जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळे येत होते. एवढेच नव्हे तर सकाळी व सायंकाळच्या वेळी गर्दीच्या ठिकाणाहून पायी चालणे देखील अवघड झाले होते. त्यातच किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून हाणामारीचे प्रकार घडले होते. तर अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता.

दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी शहरातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्याधिकारी मुंडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, प्रशासकीय अधिकारी शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, डी. पी. शिंदे, देविसिंग ठाकूर यांच्यासह पालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने अतिक्रम हटविण्यास सुरुवात केली. यामध्ये मागील पाच दिवसांत तब्बल ३०० पेक्षा अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. यामुळे आता रस्त्यांनीही मोकळा श्‍वास घेतला आहे. वाहतुकीचा मोठा अडथळा दूर झाला आहे. शहरातील अतिक्रमण काढले जात आहे. यापुढे अतिक्रमण होऊ नये, यासाठी पालिकेकडून काळजी घेतली जाईल. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नागरिकांनी शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी पुढाकार घेऊन अतिक्रमण करणे टाळावे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news