हिंगोली : जामगव्हाण शिवारात जुगार अड्डयावर छापा; १३ जणांवर गुन्हा

हिंगोली : जामगव्हाण शिवारात जुगार अड्डयावर छापा; १३ जणांवर गुन्हा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण शिवारात आखाडा बाळापूर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात २ मोबाईल १ ऑटो, ३ दुचाकी व रोख रकमेसह ३.७५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी १३ जणांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, उर्वरीत ९ जण फरार झाले आहेत.

कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण शिवारात वन विभागाच्या मोकळ्या जागेत एका झाडाखाली काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, शिवाजी बोंडले, जमादार ग्यादलवाड, रिठ्ठे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री साध्या वेशात जाऊन छापा टाकला. यामध्ये तेरा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. मात्र पोलिस आल्याचे लक्षात येताच ९ जण फरार झाले तर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, २ मोबाईल, १ ॲटो, ३ दुचाकी असा ३.७५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक वाघमारे यांच्या तक्रावरून सुरेश केशव मात्रे (सुकळी), टोपाजी तुकराम खडके, संदीप जयवंत मेंडके, ज्ञानेश्‍वर राजाराम डोखळे, भानुदास बाबाराव कऱ्हाळे, सुनील धारबा ढाकरे, बालाजी चांदूजी शेळके, मारोती देवराव मेंडके, सुनील राजाराम डोखळे, राजू सुदाम मेंडके, माधव गणेश आम्ले, देवराव मेंडके, तुकाराम मेंडके (सर्व रा. जामगव्हाण) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार रिठ्ठे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news