केज तहसीलवर रिपाइं (आठवले) यांचा संघर्ष मोर्चा धडकला | पुढारी

केज तहसीलवर रिपाइं (आठवले) यांचा संघर्ष मोर्चा धडकला

केज(बीड), पुढारी वृत्‍तसेवा  : मागील पन्नास वर्षापासून दलित भूमिहीन समाज गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्या कसत आहेत व कुटुंबाची उपजीविका करीत आहे, म्हणून आमचा त्या जमिनीवर हक्क आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या नोटीसा हे एक षडयंत्र असून आम्ही ते हाणून पाडू असा खणखणीत ईशारा रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी दिला तर दलीत अन्याया अत्याचारा विरुद्ध ठोस भूमिका घेत नसतील तर आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही इशारा तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी संघर्ष मोर्चाचे सत्ताधाऱ्यांना दिला.

गायरानधारक भूमिहीन यांच्या हक्कासाठी आणि नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी रिपाइं (आठवले) च्या वतीने केज तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला.
डॉ बाबासाहेब चौकातून निघालेला मोर्चा मंगळवार पेठ, बस स्टॅंड शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात जनविकासचे कार्यकर्त्यांसह तालुक्यातील गायराणधारक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर येताच मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी यावेळी तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, अजहर खान, रमेश भिसे, गौतम बचुटे आणि दिलीप बनसोडे यामचेहो भाषणे झाली.

आमची मते घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारच्या सत्तेत आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली. हे सरकार जर दलितांची घरे आणि गायरान काढून घेण्याचे षडयंत्र करीत असेल आणि जर गायरना संदर्भात दिलेल्या नोटीसा परत घेतल्या नाहीत तर ज्या सरकारला सत्तेवर बसविले त्याला खाली खेचण्यात येईल.
– राजू जोगदंड, (जिल्हा सरचिटणीस रिपाइं )

आम्ही कसत असलेल्या गायरान जमिनी पैकी एक इंचही जमीन सरकारला घेऊ देणार नाही. आमच्या समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांसाठी स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना सवड नसेल तर त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही.
– दीपक कांबळे, ( तालुका अध्यक्ष, केज) 

.हेही वाचा 

दगडी चाळ फेम पूजा सावंतचं प्राणी प्रेम कमालीचं

सिंधुदुर्ग : वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला वादळाचा फटका!

नगर : दोन महिलांना गंडविणारा जेरबंद

Back to top button