बीड: आरोग्य शिबिराहून परतताना कारला अपघात: दोन डॉक्टरांचा मृत्यू | पुढारी

बीड: आरोग्य शिबिराहून परतताना कारला अपघात: दोन डॉक्टरांचा मृत्यू

अंबाजोगाई: पुढारी वृत्तसेवा: आडस येथील आरोग्य शिबिरास भेट देऊन परत येताना भरधाव गाडीला अपघात झाला. या अपघातात फिजिओथेरपी करणार्‍या २ तरूण डॉक्टरांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ९) दुपारी १२ च्या सुमारास चनईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. फिजिओथेरेफिस्ट डॉ. प्रमोद बुरांडे, डॉ. रवी संतोष सातपुते (दोघे रा. अंबाजोगाई) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आडस येथे आज ओमकार आकुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला भेट देण्यासाठी दोघे डॉक्टर गेले होते. त्यानंतर शिबिराला भेट देऊन दोघे परत अंबाजोगाईकडे येत होते. यावेळी त्यांच्या भरधाव गाडीने समोरून येणार्‍या वाहनाला चुकविताना हेलकावा घेतला. आणि गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात डॉ. प्रमोद बुरांडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. रवि सातपुते यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संत रविदासनगर चनई येथील  उमाजी सातपुते यांचा नातू व शासकीय रक्तपेढी येथे कार्यरत असलेले संतोष उमाजी सातपुते यांचा  एकुलता एक मुलगा डॉ. रवी होत.

अंबाजोगाई शहरात नामांकित फिजिओथेरिफिस्ट म्हणून डॉ. बुरांडे यांची ओळख होती. मराठवाड्यासह राज्य-परराज्यातून त्यांच्याकडे उपचारासाठी रूग्ण येत होते. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोन तरूण डॉक्टरांचा मृत्यू झाल्यामुळे अंबाजोगाई शहरावर शोककळा पसरली आहे.

 

हेही वाचा 

Back to top button