हिंगोली : संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल | पुढारी

हिंगोली : संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव श्रीक्षेत्र शेगाव येथून सातशे वारकऱ्यासह टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलाचा नामस्मरणाचा जयघोष करीत भगवे पताके घेऊन २६ मे रोजी पंढरपूरकडे रवाना झाली.  श्री संत गजानन महाराज यांची पायदळ पालखी विदर्भातून दहा दिवसाच्या प्रवासानंतर पाच मे रोजी सकाळी मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर आगमन झाले. आगमन होताच भाविक भक्तांनी बँड बाजा लावून फुलाचा वर्षाव व फटाक्याच्या जल्लोषात पालखीचे स्वागत केले आहे.

विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेल्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे दुपारचे स्नेहभोजन व थोडा वेळ विश्रांती घेऊन पालखी सेनगावकडे रवाना झाली आहे. पालखीचे मराठवाड्यात आगमन होताच ज्या ठिकाणी सकाळ दुपार आणि सायंकाळ पालखी भोजन व विश्रांतीसाठी थांबले तिथे प्रत्येक घरासमोरील रस्त्यावरील आकर्षक रांगोळी काढून स्वागताचे फलक पालखीवर फुलाचा वर्षाव करत परिसरातील भाविक भक्तांकडून स्वागत केले.  जिथे थांबते तिथे काही वेळ त्याचे भक्तीमय स्वरूप घेऊन पालखीच्या टाळ मृदंगाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.

५४ वर्षांची परंपरा असलेल्या संत गजानन महाराज शेगाव येथील ते श्रीक्षेत्र माझे माहेर पंढरी अभंग प्रमाणे सर्व संताचे माहेर असलेल्या पंढरी आपल्या विठूरायाच्या भेटण्यास चाललेल्या पायदळ दिंडी सोहळ्याचे विदर्भातून मराठवाड्यात भक्त मंडळी सह गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करून व जागोजागी चहापाणी नाश्ता फराळ कोणी पानाचा विडा तर कोणी बिस्कीट पुढे व मोठमोठ्या वस्तू वारकऱ्यांना दिल्या जातात तर अनेक ठिकाणी पाय धुवून स्वागत केले जाते पालखी नेहमीप्रमाणे हत्ती घोडे सुशोभित रथावर श्री संत गजानन महाराजांची मूर्ती विराजमान असून विश्रांतीच्या ठिकाणी भाविक भक्तांची दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात
त्यानंतर पालखी सोहळा सेनगाव मार्गे पंढरपूर कडे प्रस्थान झाली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button