बीड: भावा बहिणीच्या नात्याला काळिमा; चुलत भावाने बहिणीला पळविले | पुढारी

बीड: भावा बहिणीच्या नात्याला काळिमा; चुलत भावाने बहिणीला पळविले

केज: पुढारी वृत्तसेवा: युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे. सख्ख्या चुलत भावाने अल्पवयीन सख्ख्या चुलत बहिणीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, धारूर तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन साडे सतरा वर्ष वयाची दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी ही अंबाजोगाई तालुक्यातील आणि युसुफवडगाव (ता. केज) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मामाच्या गावी आजोळी आली होती.

३१ मेरोजी अल्पवयीन मुलगी घरी आढळून आली नाही. याची माहिती मामाने मुलीच्या आई-वडिलांना फोनवरून दिली. तसेच मुलीचा इकडे तिकडे शोध घेतला. परंतु, ती आढळून आली नाही. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. २) युसुफवडगाव पोलीस ठाण्यात मुलीला त्यांच्या सख्ख्या पुतण्याने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची तक्रार दिली आहे. यावरून सख्ख्या चुलत भावानेच सख्ख्या चुलत बहिणीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चार महिन्यापूर्वी याच नराधम चुलत भावाने पळवून नेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धारुर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.

हेही वाचा 

Back to top button