विवाहित महिलेला शेतात जात असताना ऊसात ओढून जबरदस्तीचा प्रयत्न - पुढारी

विवाहित महिलेला शेतात जात असताना ऊसात ओढून जबरदस्तीचा प्रयत्न

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सुरळवाडी येथे ३० वर्षीय विवाहित महिलेला शेतात जात असताना विवाहितेला हाताला धरून उसात ओढत नेण्याचा प्रकार केल्याप्रकरणी सचिन वसंत जाधव (वय वर्षे २३ वर्षे रा. सुरळवाडी) याच्या विरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुरुवारी दि.२१ रोजी सायंकाळी उशिरा दुपारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील सुरळवाडी येथील एका ३० वर्षीय विवाहित महिलेने गंगाखेड पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी उशिरा विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, आपण शेताकडे जात असताना शेजारी शेताच्या जवळ राहणाऱ्या आरोपी सचिन वसंत जाधव याने आपला हात धरून ऊसात ओढत नेण्याचा प्रकार केला.

याप्रकरणी ओरडाओरडा केली असता आरोपी पळून गेला. संबंधित विवाहित महिलेच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड या करीत आहेत.

दरम्यान याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी दि.२२ रोजी दुपारी आरोपीस न्यायालयासमोर उभे केले. त्यास न्यायालयाने जामीनही मंजूर केला असल्याची माहिती एएसआय त्र्यंबक शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button