बीड: २ हजारांची लाच घेताना तहसील कार्यालयातील लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

बीड: २ हजारांची लाच घेताना तहसील कार्यालयातील लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

धारूर, पुढारी वृत्तसेवा : येथील तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणारे महेश कोकरे यांनी तालुक्यातील आसरडोह येथील स्मशानभूमीच्या नोंदीसाठी २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर महेश कोकरे यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ आज (दि.२) पकडले.

तालुक्यातील आसरडोह येथील एका स्मशानभूमीची नोंद करण्यासाठी महेश कोकरे यांने दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. तसेच खूप दिवसांपासून तक्रारदाराकडे अरेरावी भाषा वापरून अपमानित करत होता. शेवटी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे सदरील व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी साडेचार वाजता सापळा रचून महेश कोकरे यास रंगेहात पकडले. पुढील गुन्हा नोंद करण्याची कारवाई पोलीस करत आहेत .

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news