‘फॉर सेल’ पुरस्कार प्राप्त लघुपटाची आता अमेरिकेत निवड | पुढारी

'फॉर सेल' पुरस्कार प्राप्त लघुपटाची आता अमेरिकेत निवड

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : लघुचित्रपट लेखक, दिग्दर्शक अॅड. माने यांच्या फॉर सेल लघुचित्रपटाची निवड आता अमेरिकेत झाली आहे. व तेथे प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी इंग्लंड येथे दोन वेळा चित्रपट महोत्सवात निवड झाली व तेथे प्रदर्शित झाला होता. या व्यतिरिक्त इंग्लंद येथे दुसरा लघुपट द ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स या लघु चित्रपटाची निवड झाली होती.

फॉर सेल लघु चित्रपटाचे चित्रीकरण हे हिंगोली शहर परिसरात, रेल्वे स्टेशन, सम्राट वे अशोक नगर भागात झाले आहे. चित्रपटाचे डबिंग, एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंग व एक रॅप गाणे हिंगोलीतील क्लूआर्ट म्युझिक अँड मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्टुडिओ मध्ये झाले आहे. त्यातील सदर रॅप गाणे ए गर्ल फॉर सेल या नावाने अॅप्पल आयट्युन्स, अमेझॉन, जिओसावन स्टोअरवर रिलीज झालेले आहे.

सदर लघुचित्रपटातील रॅप गाण्याचे लेखक आणी गायक अॅड. चारुशील माने आहेत. अमेरिकेतील स्टुडन्ट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिवल (एस डब्ल्यू आय एफ एफ) 2023 च्या चित्रपट महोत्सवासाठी 2023 मध्ये एकूण 13000 लघु चित्रपट एकूण 120 देशांमधून आलेले असून त्या 13000 लघु चित्रपटांमधील ज्या चित्रपटांची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे त्यामध्ये फॉर सेल हा लघु चित्रपट आहे.

यापूर्वी बेतया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बिहार येथे दोन हजार लघु चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार फॉर सेल ला देण्यात आला होता. तसेच नेक्स्ट जन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल, पुणे व रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल औरंगाबाद, कोलकाता इंटरनॅशनल ऑनलाईन फिल्म फेस्टिवल इत्यादी फिल्म फेस्टिवल मध्ये फॉर सेल लघु चित्रपटाची निवड झाली होती व प्रदर्शित झाला आहे.

मानवी तस्करी निगडित हा चित्र लघु चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक मुली विकून राजस्थानमधील साडेतीनशे गावांमध्ये नेले असल्याची माहिती दिग्दर्शकांनी जमा केली ही माहिती जमा केल्यानंतर त्यावर दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर या लघुचित्रपटाच्या निर्मितीसाठी शासनाकडे देखील त्यांनी सात लाख खर्चाची मागणी केली होती व राष्ट्रीय स्तरावरील त्रिसदस्यीय समितीने सदरची मागणी तोड़ी मान्य देखील केली होती, परंतु ई-मेल द्वारे त्यांनी सदरची प्रस्ताव नामंजूर केला.

त्यामुळे सदर लघुचित्रपट हा स्वखर्चावर करण्याचे निर्माता क्ल्यूआर्ट कंपनी मार्फत दिग्दर्शक अॅडव्होकेट माने यांनी ठरवले आणि अखेरीस या लघु चित्रपटाची निर्मिती झाली. या लघु चित्रपटात सपना जयस्वाल, पुणे येथील राणी माने, ज्योती इंगोले, वैष्णवी निनाळ, प्रकाश मगरे, संजय व्हडगिर, बालाजी कऱ्हाळे, मदन रायबोले, चंद्रज्योती खंदारे, डॉ. ग. ल. इंगोले, राहुल दवंडे, सुरेश इंगोले, केशव जाधव, ईश्वर राऊत, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, रामदास सोनवणे, रामेश्वर कऱ्हाळे व इतर तसेच कॅमेरामन मयूर नरवाडे व विशाल दुधमल यांनी सहकार्य केले.

-हेही वाचा 

नागपूर : रात्रीस खेळ चाले! अश्लील नृत्य, ६ तरुणींसह १२ जण जाळ्यात

पुणे: वारजे हॉस्पिटलचा ठेकेदार महापालिकेवर ‘शिरजोर’

नगर: जामखेडमधून गुटखा जप्त, चौदा लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

Back to top button