नगर: जामखेडमधून गुटखा जप्त, चौदा लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक | पुढारी

नगर: जामखेडमधून गुटखा जप्त, चौदा लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

नगर, पुढारी वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातून गुटखा व तंबाखूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. तीन जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, चौदा लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजू विठ्ठल शिंदे (वय 30, रा.चौसळा, जि.बीड), मोहित सुभाष मिसाळ (वय 19), योगेश सुखदेव खाडे (वय 19, दोन्ही रा. आनंदवाडी, ता. जामखेड) या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीस गोण्या गुटखा व तंबाखू मंझिरी (ता. पाटोदा, जि.बीड) येथील गिते नामक व्यक्तीला दिल्याचे शिंदेने सांगितले व सोळा गोण्या माल विनोद छबू तोंडे (रा. बीड रोड, ता. जामखेड) याला विक्री करणार होतो, असे सांगितले.

Back to top button