Nanded News: देगलूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह १२१ ग्रा.पं. सदस्यांचे सदस्यत्व रद्द | पुढारी

Nanded News: देगलूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचासह १२१ ग्रा.पं. सदस्यांचे सदस्यत्व रद्द

देगलूर: पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका (Nanded News )झाल्या  होत्या. या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांनी १७ जानेवारी २०२३ पर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे सरपंच, उपसरपंचासह एकूण १२१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रद्द केले आहे.

देगलूर (Nanded News) तालुक्यात एकूण ७२५ ग्रामपंचायत सदस्यांची पदे आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी ४२५ पदे राखीव आहे. शासनाने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या राखीव प्रवर्गातील सदस्यांना १७ जानेवारी २०२३ पर्यंत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. शासनाकडून देण्यात आलेल्या अंतिम तारखेपर्यंत देगलूर तालुक्यातील आरक्षित पदावर निवडून ३०४ सदस्यांनी आपापली जात वैधता प्रमाणपत्रे सादर केली आहेत. परंतु शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दिलेल्या तारखेपर्यंत देगलूर तालुक्यातील १२१ ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकताच आदेश काढून जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

Nanded News : सदस्यत्व रद्द झालेल्या गावाची नावे आणि गाव निहाय सदस्य संख्या पुढील प्रमाणे-

अंतापूर-३, आलूर-२, अमदापपूर-१,अल्लापूर- इब्राहिमपूर-३, कबीर वाडी-३, करडखेड-४,करेमलकापूर-१, काठेवाडी-१, कामाजीवाडी-१, कारेगाव-मलकापूर-१, कावळगड्डा-३, कावळगाव-१,किनी-किनी तांडा-३, कुन्मारपल्ली-४, कुशावाडी-१, केदारकुंटा-१, कोकलगाव-२, क्षिरसमुद्र-३, चाकूर-२, झरी-पेंडपल्ली-३, टाकळी- जहागीर-२, तडखेल-१, तुपशेळगाव-४, दरेगाव-१, दावणगीर-३, देगाव बु.-२, देवापूर-२, नंदूर-शेकापूर-१, नरंगल-२, नागराळ-पिंपळगाव-१, बल्लूर-२, बिजलवाडी-१, बेंबरा-१ भक्तापूर-४, भायेगाव-२, भुतन हिप्परगा-४, भोकसखेडा-३, मंडगी-२, मनसक्करगा-१, मरखेल-१, मानूर-४, माळेगाव -५, मुजळगा-३, मेदन कल्लुर-१, रमतापूर-३, लिंगनकेरूर-१, लोणी-मंगाजी वाडी- पुंजरवाडी-१,शहापूर-सुजायजपुर-१, शिळवणी-१, शेवाळा-१, सांगवी(उमर)-१, सांगवी-करडखेड-१, सुंडगी (बु.) -३, सुगाव-२, सोमुर-१, हनुमान हिप्परगा-१, हणेगाव-चव्हाणवाडी-४, हाळी-१, हवरगा-१, होट्टल-३. अशा एकूण १२१ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button