Bribe : नगर मनपाचे मुख्य लेखाधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात | पुढारी

Bribe : नगर मनपाचे मुख्य लेखाधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : Bribe : येथील नगर महानगरपालिकेतील मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एका ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी 20 हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मानकर यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी व त्यांचे मावसभाऊ यांनी ठेकेदार म्हणून नगर महानगरपालिकेच्या केलेल्या कामाची बिले मंजूर करुन तक्रारदार यांना चेक अदा केलेच्या मोबदल्यात लोकसेवक मानकर यांनी तक्रारदार यांच्याकडे २५,००० रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे दि. ७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये लोकसेवक मानकर यांनी तक्रारदार यांच्याकडे २०,००० रुपयांची मागणी करून त्याच दिवशी १५,००० रुपये स्विकारण्याची संमती दर्शवली. त्यानुसार आज तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मानकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

‘लाचलुचपत’चे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे, प्रशांत सपकाळे, संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड , हारुन शेख, राहुल डोळसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button