परभणी : सिंचन विहीर खोदकामात आढळला बोगदा

परभणी
परभणी

सोनपेठ,पुढारी वृत्तसेवा: तालुक्‍यातील उखळी बु. येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिर खोदकाम करत असताना विहिरीत बोगदा आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मौजे उखळी (बु ) येथील शेतकरी गुलचंद सखाराम सावंत यांच्या शेतातील गट नंबर ६० मध्ये सिंचन विहिर खोदकाम सुरु होते. ४० फुटापर्यंत खोदकाम केले. मात्र आडव्या कपारीत अचानक मोठा बोगदा असल्याचे आढळून आले.त्यामुळे कामगार भयभित झाले बोगद्यात जेसीबीच्या साह्याने मुरुम टाकून बुजण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो बोगदा पुजल्या जात नव्हता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विहिरीवर काम करणारे मजूर काम करण्यास तयार नाहीत. सदरील घटनेचे परिसरात आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती सरपंच राजेभाऊ सावंत यांनी तातडीने तहसीलदार सारंग चव्हाण यांना माहिती कळविण्यात आली. त्यानुसार तात्काळ घटनास्थळी तलाठी अनिकेत कचारे यांनी भेट दिली. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. सिंचन विहीर खोदताना अचानक पणे भल्ला मोठा बोगदा लागल्याने तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news