छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेलंगणाच्या ‘या’ पक्षाने मैदान मारले, ग्रा.पं. पोटनिवडणुकीत गफ्फार पठाण विजयी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेलंगणाच्या 'या' पक्षाने मैदान मारले, ग्रा.पं. पोटनिवडणुकीत गफ्फार पठाण विजयी

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एकता ग्राम विकास पॅनलकडून उभे राहिलेले बीआरएस पक्षाचे उमेदवार गफ्फार सरदार पठाण हे विजयी झाले. त्यांनी या निवडणुकीत वंदना जाधव यांचा ११५ मतांनी पराभव केला.

बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्थरावर वाढवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांच्याकडून प्रयत्न केले जात असून २४ एप्रिलरोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगरात सभा घेतली होती. गुरुवारी आंबेलोहळ येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बीआरएसचे उमेदवार गफार सरदार पठाण यांनी वंदना संतोष जाधव यांचा ११५ मतांनी पराभव केला. गफ्फार पठाण यांना २५७ तर वंदना जाधव यांना १४२ मते मिळाली. गफ्फार पठाण यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार अण्णासाहेब माने, संतोष माने, मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील बनकर यांनी त्यांना मदत केल्याचे पठाण यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button