हिंगोली : बस स्‍थानकातून १ लाख ३ हजाराची राेकड चाेरीला | पुढारी

हिंगोली : बस स्‍थानकातून १ लाख ३ हजाराची राेकड चाेरीला

हिंगोली ; पुढारी वृतसेवा औंढा बसस्थानकातुन शेख अक्ख्तर शेख हकीमुकीद्दीन रा. मनोरा जि. वाशिम यांचे एक लाख तीन हजार रोख चोराने हातोहात लांबवल्‍याची घटना घडली. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली असल्‍याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. ते पाहून शेख यांनी बस स्‍थानकाच्या नियंत्रकाशी विचारपूस केली असता या ठिकाणी कॅमेरे नसल्‍याचे त्‍यांची निराशा झाली.

या विषयी अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ बसस्थानकातून शेख अक्ख्तर शेख हकीमुकीद्दीन रा. मनोरा जि. वाशिम यांचे एक लाख तीन हजार रुपये चोराने हातोहात लंपास केले. औंढा नागनाथ बस स्टॅंडच्या भिंतीवर लिहलेली सूचना सावधान आपन सीसीटीव्ही च्या नजरेत आहात. हे वाचुन शेख यांना चोर सापडण्याची आशा वाटली. त्यांनी बस स्थानकातील नियंत्रकाशी CCTV फुटेजबाबत विचारपुस केली असता, फक्त कोरडया समाधानासाठी फक्त सुचना लिहलेली आहे. असे समजल्यामुळे त्‍यांची घोर निराशा झाली.
औंढा नागनाथ हे आठवे ज्योर्तींलिंग असल्यामुळे देशभरातुन भावीक भक्त येथे येत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र cctv असणे आवश्यक असुन, बसस्थानकातही कॅमेरे सक्रीय असणे अतिआवश्यक आहे. असे असताना फक्त सूचना लिहूण प्रशासन निष्काळजीपणा करत आहे.

कॅमेरे असते तर प्रवाशाचे पैसे चोरताना चोर कॅमेऱ्यात कैद होऊन चोर शोधायला मदत झाली असती. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे. या पूर्वी वसमत बस स्टॅन्ड वरून एका महिलेचा सोन्याचा हार चोरीला गेल्याची चर्चा होती.

हेही वाचा : 

Back to top button