कुरुंदवाड शहर व परिसरात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा कुरुंदवाड शहर व परिसरात सामाजिक संस्था विविध मंडळांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 366 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयघोष, भगवे ध्वज, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

कुरुंदवाड पालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा अधियंता प्रदीप बोरगे बांधकाम, अभियंता योगेश गुरव, पालिका असोसिएशनचे नंदकुमार चौधरी आदी उपस्थित होते.

येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला माजी नगराध्यक्ष वैभव उगळे सागर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चौकात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. यावेळी वैशाली जुगळे, ओमकार बाबर, सुनील जुगळे उपस्थित होते.

येथील उदय मंडळ पाटील गल्ली संयुक्त मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला एस.के.पाटील महाविद्यालयाचे सचिव अजित देसाई, माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अधिवादन करण्यात आले. यावेळी धनंजय पाटील, सुरज पाटील, धीरज पाटील आदी उपस्थित होते.

येथील मराठा मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला शिवाजी रोडे, मराठा फौडेशन दयानंद तथा नंदकुमार नाईक, सतीश भगवान भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, नंदकुमार पाटील, अर्जुन पाटील, आनंदा शिंदे आदी उपस्थित होते

येथील गणपती मंदिर येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर ध्येयमंत्र व प्रेरणामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी गौतम पाटील, नितीश आंबी, अमृत चोपडे यांच्यासह आदी समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सकल मराठा मंडळ कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला बी.बी सूर्यवंशी,प्रा.बी.वाय चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोपाळ चव्हाण, विजय मोगणे आदी समाजबांधव उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news