छत्रपती संभाजीनगरमध्‍ये संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

छत्रपती संभाजीनगरमध्‍ये संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज (दि.१४) जल्लोषाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चारचाकी, दुचाकी, तीन चाकी वाहनांची रॅली काढण्यात आली. क्रांती चौक येथून सुरू झालेल्या रॅलीचा हडको येथील संभाजी महाराजाच्या पुतळ्याला अभिवादन करून समारोप करण्यात आला. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संजय शिरसाट जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची उपस्थित होती. रॅलीत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

बुलंद छावा कार्यालयापासून शोभायात्रा

सकाळी साडेनऊ वाजता बुलंद छावा विभागीय कार्यालय ते टी.व्ही. सेंटर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सहकारमंत्री अतुल सावे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news