हिंगोली : जवळाबाजार परिसरात ४१ अंश तापमानाची हॅट्रिक | पुढारी

हिंगोली : जवळाबाजार परिसरात ४१ अंश तापमानाची हॅट्रिक

जवळाबाजार(हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : जवळाबाजार येथे मागील दोन दिवसापासून तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होत असून सलग तिसरा दिवशी तापमान ४१अंश सेल्सियस झाले आहे. तापमानाने आज हॅट्रिक केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विवाह होत असून परिसरातील नागरीकांना उपस्थितीत राहून सदिच्छा भेट देण्यास येताना उन्हाच्या त्रासाला सामाेरे जावे लागत आहे.

मागील पंधरा दिवसांत तापमानात बदल होत ढगाळ वातावरणामूळे उन्हाची तीव्रता कमी होती. परंतु परिसरात मंगळवार पासून तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होत असून, मंगळवारी ३९ अंश, बुधवारी ४१अंश, गुरुवारी ४१ अंश व शुक्रवारी ४१अंश सेल्सियस तापमान वाढत असून सलग तीन दिवस ४१अंश सेल्सियस तापमान आकडा  पार करून हॅट्रिक केली आहे. तर आगामी  दोन दिवसात तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होणार असे सांगण्यात आले आहे. वाढत्या‍ उन्हामूळे दुपारनंतर बाजार पेठेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

-हेही वाचा 

CBSE 10th Result 2023 | सीबीएसई १२ वी नंतर १० वी निकालही जाहीर, इथे पाहा तुमचा निकाल

फटाफटी : बंगाली सुपरस्टार रिताभरी चक्रवर्तीच्या चित्रपटाचे मुंबईत स्क्रीनिंग

‘अब तेरा क्या होगा संजय राऊत’ : नितेश राणेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र

Back to top button