जालना : घनसावंगी अंबड रोडवर भीषण अपघातात तरुण ठार | पुढारी

जालना : घनसावंगी अंबड रोडवर भीषण अपघातात तरुण ठार

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी-अंबड रोडवर कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. किशोर दिलीप कारके (वय २५ रा.अंबड) असे त्‍याचे नाव आहे. या दुर्घटनेत दाेन्‍ही वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे.

माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी घेतली अपघाताची दखल

घनसावंगी-अंबड रोडवर कार -दुचाकीची समाेरासमाेर धडक झाली. दुचाकीस्वार किशोर गंभीर जखमी झाला.  अशाच अवस्थेत ताे रस्‍त्‍याच्‍या कडेला पडून होता. त्याच वेळी या रस्‍त्‍यावरुन माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे  जात हाेते.  त्यांनी तत्‍काळ अपघातग्रस्त तरूणास  स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेमधून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तसेच  पुढील उपचाराबाबत डॉक्टरांना सूचनाही दिल्या. मात्र उपचारापूर्वीच किशोर कारके याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अपघातस्थळी दुचाकी आणि कारचे मोठे नुकसान झाले. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हूंबे, विष्णू चव्हाण,दीपक पाटील,स्वप्निल भिसे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा;

Back to top button