लातूर-अंबाजोगाई महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार | पुढारी

लातूर-अंबाजोगाई महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार

रेणापूर; पुढारी वृत्तसेवा : कंटेनरला ओव्हरटेक करीत असताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना लातूर -अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील निवाडा फाट्याजवळ आज (दि.३०) दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, रबानी अजीम शेख (वय ३५, रा. चांडेश्वर ता. लातूर), अजय संजय जाधव (वय ३७ ), व जयराज प्रताप काळे – पाटील (वय ४०, रा. बेंबळी – टाकळी जि.उस्मानाबाद) हे  अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे लग्नासाठी जात होते. ते  लातूर – अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर आले. निवाडा फाट्याजवळ कंटेनर (क्र. एनएल, ०२ एए ०२०४ ) ला ओव्हरटेक करीत असताना दुचाकी क्रंमाक (एमएच २५ एव्ही १०३६) ला कंटेनरची धडक बसली. यामध्ये रबानी व अजय हे कंटेनरच्या मागील टायरखाली सापडले. त्‍यांचा जागीच मृत्यू झाला. जयराज प्रताप काळे – पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा  

 

 

 

Back to top button