

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप व काँग्रेसच्या संयुक्त पॅनलची बाजार समितीने एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादीच्या पॅनलने सहा जागांवर विजय मिळवित प्रस्थापितांना आव्हान देतबाजार समितीमध्ये सत्तांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हिंगोली बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी दोन्ही शिवसेना, भाजपा, काँग्रेसने आघाडी करून राष्ट्रवादीला एकटे पाडले होते. (APMC Election) त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी असंतुष्टांना सोबत घेऊन वेगळे पॅनल तयार केले होते. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा मनसुबे उधळले गेले होते. मतदानानंतर निकालाबाबत उत्सूकता निर्माण झाली होती. (APMC Election )
हेही वाचा;