

अकोलाः पुढारी वृत्तसेवा : जिल्हयातील अकोला, अकोट आणि बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्थापितांना सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. तर पहिल्यांदा बाजार समिती निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदरी अपयश आले आहे.
अकोला, अकोट व बार्शीटाकळी तालुक्यातील सातपैकी तीन बाजार समित्यांवर प्रस्थापितांनी आपली सत्ता राखली आहे. प्रामुख्याने राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या अकोला बाजार समितीवर महाविकास आघाडीला यश मिळवता आले. अकोला बाजार समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. सर्वच्या सर्व 18 जागांवर सहकार पॅनलने एकतर्फी विजय संपादन केला. या निवडणुकीत वंचित प्रणित पॅनलचा धुव्वा उडाला. अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 जागा मिळाल्या आहेत.
या बाजार समितीवर स्थापनेपासून पळसोबडे येथील धोत्रे कुटुंबियांची एकछत्री सत्ता आहे. धोत्रे घराण्याने 'सहकार गटा'च्या छत्रछायेखाली सर्व पक्षातल्या लोकांना एकत्र करीत येथे कायम सत्ता राखली आहे. सध्याचे खासदार संजय धोत्रे यांचे वडील दिवंगत माजी आमदार श्यामराव धोत्रे, संजय धोत्रे यांचे चुलतबंधू आणि माजी मंत्री दिवंगत वसंतराव धोत्रे, वसंतराव धोत्रेंचा मुलगा आणि सध्याचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या नेतृत्वात या बाजार समितीवर सातत्याने या घराण्याची सत्ता राहिली आहे. या निवडणुकीत वंचितच्या पॅनलचा सुफडा साफ करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं सर्वच्या सर्व 18 जागा एकहाती जिंकल्या आहेत.
एकूण जागा : 18
राष्ट्रवादी : 09
भाजप : 05
काँग्रेस : 02
ठाकरे गट : 02
विजयी उमेदवार पक्ष/आघाडी
1) विकास पागृत ठाकरे गट
2) दिनकर वाघ राष्ट्रवादी
3) वैभव माहोरे भाजप
4) संजय गावंडे भाजप
5) चंद्रशेखर खेडकर राष्ट्रवादी
6) राजीव शर्मा भाजप
7) शिरीष धोत्रे राष्ट्रवादी
8) दिनकर नागे राष्ट्रवादी
9) राजेश बेले भाजप
10) भरत काळमेघ भाजप
11) ज्ञानेश्वर महल्ले काँग्रेस
12) अभिमन्यू वक्टे काँग्रेस
13) सचिन वाकोडे राष्ट्रवादी
14) रामेश्वर वाघमारे राष्ट्रवादी
15) शालिनी चतरकर राष्ट्रवादी
16) माधुरी परनाटे राष्ट्रवादी
17) मुकेश मुरूमकार ठाकरे गट
18) हसन चौधरी राष्ट्रवादी
एकूण जागा : 18
सहकार गट (काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप) : 15
अपक्ष : 03
विजयी उमेदवारांची नावं आणि त्यांचा पक्ष/आघाडी
विजयी उमेदवार पक्ष/आघाडी
1) शंकरराव लोखंडे सहकार
2) अविनाश जायले सहकार
3) रमेश वानखडे सहकार
4) अंजली सोनोने सहकार
5) अरूणा अतकड सहकार
6) कुलदीप वसू सहकार
7) गोपाल सपकाळ सहकार
8) सुनिल गावंडे अपक्ष
9) रितेश अग्रवाल अपक्ष
10) अजमल खा आसिफ खा अपक्ष
11) प्रमोद खंडारे सहकार
12) श्याम तरोळे सहकार
13) गजानन डाफे सहकार
14) विजय रहाणे सहकार
15) बाबुराव इंगळे सहकार
16) धिरज हिंगणकर सहकार
17) प्रशांत पाचडे सहकार
18) अतुल खोटरे सहकार
एकूण जागा : 18
सहकार आघाडी ( काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट आणि भाजप) : 15
वंचित-मिटकरी आघाडी : 03
बार्शीटाकळी बाजार समितीतील विजयी उमेदवार आणि त्यांचे पक्ष/आघाडी
विजयी उमेदवार पक्ष/आघाडी
1) मंगला गोळे सहकार
2) गंगाबाई सोनटक्के सहकार
3) महादेव काकड सहकार
4) अशोक राठोड सहकार
5) अशोक कोहर वंचित-मिटकरी
6) कल्पना जाधव वंचित -मिटकरी
7) गोपाळराव कटाळे वंचित-मिटकरी
8) शेख अजहर शेख जमीर सहकार
9) रमेश बेटकर सहकार
10) अशोक इंगळे सहकार
11) सुरेश शेंडे सहकार
12) अनिलकुमार राऊत सहकार
13) गोवर्धन सोनटक्के सहकार
14) प्रभाकर खांबलकर सहकार
15) महादेव साबे सहकार
16) रूपराव ठाकरे सहकार
17) वैभव केदार सहकार
18) सतीश गावंडे सहकार
हेही वाचा