महाराष्ट्रात ६ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता : श्रीनिवास औंधकर | पुढारी

महाराष्ट्रात ६ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता : श्रीनिवास औंधकर

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : मराठावाड्यातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला आहे. यामध्ये पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, ५ ते ६ मेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाच जोरदार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

आज दुपारी दीडच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरला वादळी वारे व  विजांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले. सुरुवातीस काळ्या ढगांनी आकाश झाकून गेल्याने शहरावर अंधार जाणवू लागला अचानक सोसाट्याचा वारा आल्याने अनेक ठिकाणी या वेगवान वाऱ्याचा सामना करणे कठीण गेले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. या वेळी एमजीएम विद्यापीठातील हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ताशी 42 किलोमीटर नोंदवली गेली. सोबतच जोरदार पावसाने देखील हजेरी लावली. यादरम्यान 13.7 एमएम एकूण पावसाची नोंद झाली, अशी माहिती औंधकर यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button