छत्रपती संभाजीनगर : दोघा सख्ख्या भावांकडून तरूणाचा खून | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : दोघा सख्ख्या भावांकडून तरूणाचा खून

वैजापूर : पुढारी वृत्‍तसेवा किरकोळ कारणावरून दोघा सख्ख्या भावांनी मिळून एका तरुणाचा दगडाने मारहाण करून खून केला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी लासुरगाव येथे उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृष्णा पोपट हरिश्चंद्रे (वय २८ वर्षे रा.लासुरगाव ता.वैजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, लासुरगाव येथील कृष्णा व संशयितांचा मागील काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. गुरुवारी रात्री संशयित व कृष्णा यांच्यामध्ये पुन्हा वादावादी झाली. त्यावेळी दोघा भावांनी कृष्णाच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. यात गंभीर दुखापत झाल्याने कृष्णा जागीच गतप्राण झाला.

आज (शुक्रवारी) सकाळी कृष्णा मृतावस्थेत आढळून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक मनोज पाटील, हवालदार किरण गोरे, प्रशांत गिते, गणेश पैठणकर, गोपाळ जोनवाल गणेश कुलट यांनी धाव घेतली. गोरे यांनी चौकशी करून मारहाण करणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :  

Back to top button