छत्रपती संभाजीनगर : भर दुपारी शहर अंधारले, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : भर दुपारी शहर अंधारले, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐन उन्हाळ्यात भर दुपारी कडक उन्हाऐवजी आज (शुक्रवार) काळ्याकुट्ट ढगांनी शहराला कवेत घेतले. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात काही वेळ अंधार पसरला. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे वाहनधारकांना दुपारीच वाहनांचे दिवे लावावे लागले. दुपारी साडेबारा वाजता ढगांनी अंधारून आले. सोबतच विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला आणि सोबतच अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक निसर्गाच्या या बदललेल्‍या रूपामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली.

कधी उन तर कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळीचा शिडकावा असा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असला तरी, शहरावर काळ्याकु्ट्ट ढगांची गर्दी होण्याची ही या मोसमातील पहिलीच वेळ, दुपारी साडेबारा वाजता अंधाराचा सुरु झालेला हा खेळ अर्ध्या तासात संपला, ढगांच्या गर्दी सोबतच सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटही झाला.

गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपना दिसून येत आहे, उन्हाळ्यामध्ये पाऊस या मोसमात सततचा झाला आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. साडेबारा वाजेपर्यंत ढगांची गर्दी वाढल्यामुळे एकदम अंधार पसरला आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. सिडको, हडको तसेच मध्यवर्ती शहराच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. आठवड्यातून एकदा तरी कमी अधिक प्रमाणात अवकाळीचा पाऊस हमखास होत असल्याचा प्रकार मार्च आणि एप्रिल महिन्यात सुरु आहे.

हेही वाचा : 

Back to top button