परभणी : मानवत मध्ये मुलाकडूनच बापाची हत्‍या | पुढारी

परभणी : मानवत मध्ये मुलाकडूनच बापाची हत्‍या

मानवत; पुढारी वृत्तसेवा घर खर्चाला पैसे न देता मित्रांसोबत दारू पिऊन पैसे उडवत असल्‍याच्या रागातून मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील एका (२८ वर्षीय) युवकाने आपल्या (५८ वर्षीय) बापाची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे हत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी मोठया भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी ता रात्री १० च्या सुमारास येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या दुर्देवी घटनेत मृत झालेल्या बापाचे नाव दत्तात्रय देविदास भोकरे (वय ५८) असून अटक केलेल्या निर्दयी मुलाचे नाव परमेश्वर दत्तात्रय भोकरे (वय २८ वर्षे) आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सदरील व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, कुऱ्हाडी व घातक हत्याराने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मारहाण करून खून झाल्याचे गावातील काही जणांना दिसून आले.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, बीट अंमलदार भारत नलावडे, नामदेव पवार व राजू इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत तपासाची चक्रे फिरवली. मुलानेच बापाचा निर्दयीपणे खून केल्याचे निष्पन्न झाल. बाबासाहेब उर्फ बाबाशा दत्तात्रय भोकरे या मोठया भावाच्या तक्रारीवरून लहान भाऊ परमेश्वर भोकरे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे हे करीत आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागिय पोलीस अधिकारी गोफने यांनी भेट दिली.

हेही वाचा : 

Back to top button