Jagannath Temple : लंडनमध्ये उभारले जाणार 250 कोटी रुपयांचे ‘भव्य’ मंदिर | पुढारी

Jagannath Temple : लंडनमध्ये उभारले जाणार 250 कोटी रुपयांचे 'भव्य' मंदिर

पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनमध्ये भगवान जगन्नाथांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. ब्रिटिश धर्मादाय संस्थेच्या अंतर्गत लंडनमधील श्री जगन्नाथ सोसायटीच्या सहभागाने हे मंदिर बांधले जाणार आहे. ब्रिटनमधील भगवान जगन्नाथांचे हे पहिले मंदिर असेल. या मंदिराला मुळच्या ओडिशा वंशाच्या एका उद्योजकाने 254 कोटी रूपये (25 दशलक्ष पौंड) देण्याचे वचन दिले आहे. मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, असेही सांगण्यात येत आहे.

मंदिर बांधकाम प्रकल्पात सहभागी असलेली श्री जगन्नाथ सोसायटी, यूके (SJS) ही संस्था इंग्लंडमधील धर्मादाय आयोगाकडे नोंदणीकृत आहे. जागतिक भारतीय गुंतवणूकदार विश्वनाथ पटनायक यांनी रविवारी लंडनमध्ये झालेल्या पहिल्या श्री जगन्नाथ संमेलनात ही शपथ घेतली, असे संस्थेने म्हटले आहे.

विश्वनाथ पटनायक हे फायनेस्ट ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि प्रकल्पाचे प्रमुख देणगीदार आहेत. विश्वनाथ पटनायक यांनी लंडनमध्ये भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर बांधण्यासाठी २५० कोटी देण्याचे वचन दिले आहे, असे धर्मादाय संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे.

फायनेस्ट ग्रुप ही एक खाजगी इक्विटी गुंतवणूक कंपनी आहे. जी जागतिक स्तरावर अक्षय, इलेक्ट्रिक वाहने (EV), हायड्रोजन लोकोमोटिव्ह, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि फिनटेकमध्ये गुंतवणूक करते. समूहाने नवीन मंदिरासाठी अंदाजे 15 एकर जमीन खरेदी करण्यासाठी 70 दशलक्ष पौंड देण्याचेही वचन दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button