राज्यातील कर्मचारी बँकांची उद्या सहकार परिषद | पुढारी

राज्यातील कर्मचारी बँकांची उद्या सहकार परिषद

नगर; पुढारी वृत्त्तसेवा : येत्या रविवारी दि. 23 रोजी राहाता येथे राज्यातील कर्मचार्‍यांच्या बँकांची सहकार परिषद आयोजित केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, राजकुमार साळवे, विद्याताई आढाव, अंजली मुळे यांच्या उपस्थितीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे व उपाध्यक्ष कैलास सारोक्ते यांनी केले आहे.

राज्यातील कर्मचार्‍यांच्या बँकांच्या वसुली बाबत राज्यात एकच धोरण असावे, कर्मचार्‍यांचे पगार शिक्षक बँकेमध्ये व्हावे, जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांच्या वसुलीची हमी मिळावी, तसेच कर्मचार्‍यांचे बँकांचे नवीन शाखेबाबत निकष बदलावे आदी विषयावर या परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बँकेच्या कारभारामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं, अशा सर्व माजी चेअरमन, माजी संचालक, शिक्षक नेते व कर्मचारी यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे.

बँकेच्या शताब्दी निमित्त जिल्ह्यातील शिक्षक भगिनींचे योगदान मोलाचे असल्याने त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात 100 शिक्षिकांचा सावित्रीच्या लेकी पुरस्काराने सन्मान केला. या सहकार परिषदेला जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींनी उपस्थित राहावे,असे आवाहन बापूसाहेब तांबे, राजकुमार साळवे, विद्याताई आढाव, दत्ता पाटील कुलट, विठ्ठलराव फुंदे, गोकुळ कळमकर, मनोज सोनवणे, साहेबराव अनाप, कल्याणराव लवांडे, राजेंद्र निमसे,दिनेश खोसे, शरद वांढेकर, आबा दळवी, संतोष दुसंगे, राजू राहणे, किसनराव खेमनर, राजेंद्र सदगीर, अंजलीताई मुळे, सलीमखान पठाण, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाट, आर.टी. साबळे, नारायण पिसे, सुयोग पवार, बाबासाहेब खरात, अण्णासाहेब आभाळे, सरस्वती घुले, भाऊराव राहिंज, शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे, रमेश गोरे, गोरक्षनाथ विटनोर, महेश भनभणे आदींनी केले आहे.

Back to top button