परभणी: मारहाणीत पुतण्याच्या बचावासाठी गेलेल्या काकाचा मृत्यू : १२ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

परभणी: मारहाणीत पुतण्याच्या बचावासाठी गेलेल्या काकाचा मृत्यू : १२ जणांवर गुन्हा दाखल

मानवत; पुढारी वृत्तसेवा: पुतण्याला मारहाण करणाऱ्या तरुणांना अडविण्यासाठी गेलेल्या काकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हरिजितसिंग टाक असे मृत काकाचे नाव आहे. काकालाही शिवीगाळ व दमदाटी केल्याने काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी १२ जणांवर आज (दि.१५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुतण्या हरभजनसिंग टाक यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कोक्कर कॉलनी भागातील हरभजनसिंग जगदिशसिंग टाक (वय १५) याला तरुणांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.१४) रात्री ८:३० च्या सुमारास पोलीस स्टेशन च्या बाजूला असलेल्या गरुड पुतळ्याजवळ घडली. ही मारहाण सोडविण्यासाठी हरभजनसिंगचे काका हरिजितसिंग टाक गेले होते. परंतु काकांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. यावेळी त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

या प्रकरणी रमेशसिंग दरबार बावरी, आयासिंग खानसिंग बावरी, रुबाबसिंग मूलगसिंग बावरी, बरसातसिंग आयासिंग बावरी, बलिंदरसिंग बल्लूसिंग बावरी, रवींद्रसिंग रणजितसिंग टाक, लखनसिंग दिपूसिंग जुनी, भगतसिंग अयसिंग बावरी, पवनसिंग गब्बुसींग बावरी, हरदयालसिंग जवहरर्सींग बावरी, भीमसिंग टिपूसिंग जुनी, दीपसिंग रुबाबसिंग बावरी (सर्व रा. पाथरी नाका) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button