परभणी : देवगाव फाटाजवळ जेसीबी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक; पाच जण जखमी | पुढारी

परभणी : देवगाव फाटाजवळ जेसीबी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक; पाच जण जखमी

चारठाणा (परभणी); प्रतिनिधी : संभाजीनगरहून औंढा नागनाथकडे दर्शनासाठी जात असताना चारचाकी कार (क्र. एमएच १३ सीके ०८१०) व देवगाव फाट्याहून उलट्यादिशेने जाणारी जेसीबी (क्र. एमएच २२ सीएम ४१६१) चालकाचा ताबा सुटल्याने समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहनातील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात राजेंद्र नाथराव गुरव, रत्‍नाबाई मारुती पाटील (वय ६५), ज्योती राजेंद्र गुरव (वय 30), तनवीर राजेंद्र गुरव (वय १४), गौरवी राजेंद्र गुरव( वय ८ सर्व रा. संभाजीनगर) या जखमी जखमी झाले आहे. जखमी रत्‍नाबाई मारुती पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळतात ट्रॅफिकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम शेख शकील गिराम व चारठाणा बीटचे सुधाकर कुटे आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना पुढील उपचारासाठी मदत केली.

अधिक वाचा :

Back to top button