बीड : साळेगाव येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी | पुढारी

बीड : साळेगाव येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

केज: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील साळेगाव येथे गालफाडे यांच्या शेताजवळ भरधाव कारने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. १६) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. घटनेनंतर कारचालक केजच्या दिशेने पळून गेला.

याबाबतची अधिक माहिती अशी की आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास कळंबकडून केजकडे जात असलेल्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या मोटार सायकलला (एम एच-२३/के-५३००) धडक दिली. या अपघातात नंदकुमार जोगदंड (रा. भाटुंबा, ता. केज) हा गंभीर जखमी झाला. तर कार चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला.

या अपघाताची माहिती अरुण झाडबुके आणि जय जोगदंड यांनी पोलिसांना दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button