छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसकडून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसकडून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्‍तसेवा जवाब दो जवाब दो मोदी सरकार जवाब दो, सैनिको के सन्मान में काँग्रेस मैदान मे.. अशा घोषणा देत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेत केंद्र सरकारच्या चुकीमुळे जवानांचा बळी गेल्याचा व ३०० कोटीची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगीतले, असाही थेट आरोप मलिक यांनी केला. त्यांच्या आरोपांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही.

माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि.१७) “जबाब दो मोदी, जबाब दो” आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सैनिको के सन्मान मे काँग्रेस मैदान मे, जबाब तो जबाब तो मोदी सरकार जवाब दो अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button