बीड: केज तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून बैल, गाय दगावली

बीड: केज तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून बैल, गाय दगावली

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील बोरगाव बु.सह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आज (दि. ८) दुपारी जोरदार पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतातील गहू, ज्वारीसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर तासभर पडलेल्या पावसामुळे ओढे नाल्यांने मोठे पाणी आले आहे. हदगाव, डोका येथेही गारांचा जोरदार पाऊस पडला आहे.

केज तालुक्यातील नांदूरघाट, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. या गारपिटीने आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे बैल दगावला. तसेच मांगवडगाव येथेही वीज पडून दत्तू मुळूक गाय दगावली आहे.

बोरगावच्या शिवारात दुपारी अडीच ते साडेतीन वाजता जोरदार वाऱ्यासह आलेल्या गारांच्या पावसाने हाहाकार उडवला. अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेले गहू, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतात गोळा करून ठेवलेली कणसे पाण्यात बुडाली. आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news