हिंगोली: दांडेगाव येथे घरफोडीत २ लाखांचे दागिने लंपास

हिंगोली: दांडेगाव येथे घरफोडीत २ लाखांचे दागिने लंपास
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मेनगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून कपाटातील सोन्याचे दागिने व एका पत्राच्या पेटीतील सोन्याचे दागिने व नगदी रूपये असा एकूण 2 लाख 8 हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दांडेगाव येथील नितीन गणेशराव साळुंके पत्नी, आई व दोन मुलांसह राहतात. नेहमीप्रमाणे गुरूवारी नितीन व त्यांचे कुटुंबिय साडेअकराच्या सुमारास झोपी गेले. त्यानंतर सकाळी साडेचारच्या सुमारास नितीन यांना जाग आली असता त्यांनी मागच्या खोलीत जावून पाहिले असता कपाटातील सोन्याचे दागिने व पत्र्याची पेटी गायब असल्याचे दिसून आले. तसेच घराच्या मेन गेटचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. कपाटामधील सोन्याचे दीड तोळ्याचे लॉकेट, 1 तोळ्याच्या 2 अंगठ्या, कानातील वेल, 1 बदामी अंगठी, गळ्यातील सोन्याचा 5 ग्रॅमचा ओम, तसेच पेटीत असलेले 25 हजार रूपयांची रोकड, 1 ग्रॅमचे सोन्याचे मनी, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 2 लाख 8 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड यांनी घटनास्थळी भेट दिली. नितीन गणेशराव साळुंके यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील महिनाभरापासून आखाडा बाळापूर शहरासह हद्दीतील अनेक गावांमध्ये चोर्‍यांच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील चोरीचा तपास लावण्याचे आव्हान आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांसमोर आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news