छत्रपती संभाजीनगर: बहिणीला भेटायला जाताना वीज पडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: बहिणीला भेटायला जाताना वीज पडून तरुणाचा मृत्यू

अंभई; पुढारी वृत्तसेवाः सिल्लोड तालुक्यातील तांडा सिरसाळा येथे वीज पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ७) दुपारी २ च्या सुमारास घडली. आबादान भिका राठोड (वय २७, रा. वरसेडा तांडा, ता. पाचोरा) असे मृत तरूणाचे नाव आहे.

आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी तांडा येथे आपल्या बहिणीकडे आबादान निघाला होता. दरम्यान, जोराच्या पावसाला सुरूवात झाल्यामुळे आसरा घेण्यासाठी तो सिरसाळा शिवारात एका लिंबाच्या झाडाखाली उभा राहला. यावेळी तो आपल्या बहिणीसोबत मोबाईलवर बोलत असताना अचानक वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव शेळके आणि अजिंठा पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा 

Back to top button