…म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाई : डॉ. मारोती कॅतमवार | पुढारी

...म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाई : डॉ. मारोती कॅतमवार

वसमत; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांची खासदारकी मोदी सरकारकडून अवघ्या २४ तासांत रद्द करण्यात आली. मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते डॉ. मारोती कॅतमवार यांनी केली.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्हा, तालुका या ठिकाणी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वसमत काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि. ७) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कॅतमवार बोलत होते.

ते म्हणाले की, राहुल गांधी हे ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत, असे चित्र रंगवण्यात येत आहे. मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊन विरोधकांना संपवण्यासाठी डाव आखत आहे. त्यामुळे या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढील काळात जिल्हा व तालुका पातळीवर आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष राजाराम खराटे, शहराध्यक्ष शेख अल्लीमोद्दीन, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष साईनाथ जाधव, युवराज आवटे, पिंटू महाकाळ, अशोक मज्जनवार, कामाजी मुळे, कपिल जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button