परभणी : गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू | पुढारी

परभणी : गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील मित्रासोबत गोदावरी नदी पात्रात पोहण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. तुकाराम पांडुरंग काळे (वय १२) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तुकाराम काळे हा इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत होता. तो नदीपात्रात मित्रासोबत गुरुवारी (दि.२४) चारच्या दरम्यान मित्रासोबत पोहत होता. अचानक त्याच्या पायास जलचर प्राण्याने चावा घेतल्याचे कळताच तो व त्याच्या मित्र पाण्याबाहेर आले असता त्यास वाळूवर झोपले पण लगेच त्याच्या तोंडातून फेस आल्यामुळे त्य़ाचा मृत्यू झाला.

हेही वाचंलत का?

Back to top button