आशा भोसले महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती | पुढारी

आशा भोसले महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ पार्श्व गायिका आशा भोसले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आज धन्य झालो. आशा भोसले यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली. आशा भोसले यांच्याकडून १०० वर्षे संगीताची सेवा होत राहो . १९५१ पासून ते महाराष्ट्र भुषण मिळण्यापर्यंतचा आशा भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एकाच दिवशी ७ गाणी गाण्याचा विक्रम आशा भोसले यांच्या नावावर आहे.जवळजवळ २० भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली आहेत. मंगेशकर कुटुंबाने जी संगीताची जी सेवा केली ती अविस्मरणीय आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचंलत का?

Back to top button