बीड : सालगड्याचा मालकाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताची पोलीस कोठडीत रवानगी | पुढारी

बीड : सालगड्याचा मालकाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताची पोलीस कोठडीत रवानगी

केज; पुढारी वृत्तसेवा : गुढी पाडव्याच्या सणाच्या दिवशी केज तालुक्यात एका सालगड्याने मालकाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सालगड्याचे नाव नागनाथ शहाजी शिंदे (वय ४० वर्ष) असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावात शेतात मजुरी काम करणाऱ्या सालगड्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून मालकाच्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलीला त्याने बळजबरीने शेतातील घराच्या पाठीमागे असलेल्या निर्मनुष्य स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.

यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात नागनाथ शिंदे याच्यावर लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ (२), १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी यांनी त्याला ताब्यात घेतले. जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे नागनाथला हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २५ मार्चपर्यंत म्हणजे, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : 

Back to top button